Mumbai Rupali Patil: मनसेच्या माजी पदाधिकारी रुपाली पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश? ABP Majha
मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर माजी नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरे राष्ट्रवादीत प्रवेश केला. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राज ठाकरे यांना पत्र पाठवून मनसे सोडत असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. पुण्यातील माजी नगरसेविका असलेल्या रुपाली पाटील यांनी त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करून नवी राजकीय वाटचाल सुरु केलीय.
Tags :
Ncp MNS Deputy Chief Minister Ajit Pawar Former Corporator Pravesh Rupali Patil-Thombre State President Jayant Patil