Coronavirus | महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
दुबईहून प्रवास करुन आलेले पुण्यातील पती-पत्नीला कोरोना व्हायरसची लागल झाल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांचाही शोध घेणे सुरू केलं आहे. या दाम्पत्याची मुलगी तसेच ज्या टॅक्सीने या रुग्णांनी मुंबई-पुणे प्रवास केला, तो टॅक्सी ड्रायव्हर आणि त्यांचा विमानातील सहप्रवासी हे तिघेही कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे. दरम्यान राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानं बुधवारी (10 मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अतिशय महत्त्वाची बैठक बोलावली आहे.