Mumbai Rains : मुंबईसह राज्यात पावसाची हजेरी, अजूनही रिपरिप सुरुच ABP Majha
abp majha web team
Updated at:
02 Dec 2021 07:52 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात जणूकाही जुलै महिना परतलाय की काय, असं वातावरण आहे. कारण हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातल्या काही भागात चांगलाच पाऊस बरसतोय. मुंबई शहर आणि परिसरात रात्रभर पाऊस झालाय. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरारला काल संध्याकाळपासून पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. नवी मुंबईतील खारघर, बेलापूर, कळंबोली आणि पनवेल भागातही सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार सरी अधूनमधून हजेरी लावताहेत. काल संध्याकाळपासून अवकाळीनं मुंबईसह एमएमआरडीए भागात विश्रांती घेतलेली नाही.