Mumbai Rains | मुंबई, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, पुढील 3-4 तास महत्त्वाचे

Continues below advertisement
मुंबई आणि रायगड परिसरात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने हा इशारा दिला आहे. पुढील तीन ते चार तासांमध्ये मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि संपूर्ण राज्यभरात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मुंबई आणि रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील तीन ते चार तास मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रशासनाकडून वारंवार काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. तसेच, "गरज असेल तरच घराबाहेर पडा" असं आवाहनही प्रशासनाकडून मुंबईकरांना करण्यात आलं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांसाठी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola