Monsoon Superfast : महाराष्ट्रातील पावसाच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 19 August 2025

मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीत अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रात्री पावणे नऊच्या सुमारास समुद्राला भरती येणार असून, तीन पूर्णांक चौदा मीटर्सच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. सततच्या पावसामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. मुंबई विमानतळाच्या कार्गो टर्मिनलमध्ये पाणी भरले असून, रनवेवर पाणी साचल्याने अनेक विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. सुमारे अडीचशे विमानांचे उड्डाण उशिरा झाले. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल सेवा ठप्प झाल्या आहेत. माटुंगा-कुर्ला स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने वाहतूक थांबली आहे. पश्चिम रेल्वेची ट्रान्स हार्बर लाईन विस्कळीत झाली आहे. वसईच्या मधुबन परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या कार पाण्यात बुडाल्या, काही वाहून गेल्या. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. कुर्ला क्रांतीनगर भागातील साडेतीनशे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. वसई-विरार शहरातील रुग्णालयांमध्येही पाणी शिरले आहे. वसईमध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफची टीम दाखल झाली असून, आतापर्यंत तीनशे नागरिकांना वाचवण्यात आले आहे. मुलुंडमधील वसंत ऑस्कर विभागात दहा ते बारा फुटी अजगर सापडला, ज्याला सर्पमित्रांनी जंगलात सोडले. बीकेसी मेट्रोमध्येही पाण्याची गळती झाली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या मतदारसंघात जाऊन पाणी साचलेल्या भागांचा आढावा घेतला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola