Mumbai Train Disruptions | पश्चिम रेल्वेही उशिराने, ट्रॅकवर पाणी साचले!
मुंबईतील रेल्वे वाहतुकीचा आढावा घेण्यात येत आहे. माहीम आणि माटुंगा रोड रेल्वे स्थानकांदरम्यान ट्रॅकवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने सुरू आहे. ही दृश्ये आता समोर आली आहेत. पश्चिम रेल्वेवरील ही दोन्ही स्थानके आहेत आणि या दोन स्थानकांच्या मध्ये ट्रॅकवर साचलेले पाणी दिसत आहे. त्यामुळे आता इथली वाहतूक मंदावली आहे. याआधी हार्बर रेल्वे आणि मध्य रेल्वेची वाहतूकही खोळंबली होती. या सगळ्याचा परिणाम आता पश्चिम रेल्वेवरही होताना दिसत आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूकही सध्या वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने सुरू आहे. अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले असून, रेल्वे ट्रॅक दिसेनासे झाले आहेत. इथपर्यंत पाणी साचलेले दिसत आहे. त्यामुळे आता पश्चिम रेल्वेची वाहतूकही मंदावली आहे. इथल्या नागरिकांना आणि प्रवाशांना याचा फटका बसू शकतो.