Dadar Water Logging | दादर-माटुंग्यात पावासाचं पाणी साचलं,मुंबईकर हैराण
मुंबईत काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. दादर रेल्वे स्थानक आणि माटुंगा परिसरातही पाणी साचले आहे. सायनच्या किंग सर्कल भागात तीन फूट पाणी साचले असून, अनेक गाड्या या पाण्यात बंद पडल्या आहेत. बस देखील अडकून पडल्याने वाहतूककोंडी झाली आहे. दोन ते तीन किलोमीटर लांब ट्रॅफिकच्या रांगा लागल्या आहेत. आज दहिहंडीचा उत्सव असल्याने गोविंदा पथकांनाही अडचणी येत आहेत. प्रशासनाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पोलीस प्रशासन नागरिकांना मदत करत आहे, तर बीएमसीचे आपत्कालीन व्यवस्थापन कक्षही सक्रिय झाले आहे. मुलांच्या शाळांना सुट्टी आहे, तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. एका नागरिकाने सांगितले, "सर्वसामान्य लोकांचा हाल होत आहे। बाकी काही नाही." पाणी उपसण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे.