Morning Prime Time News : मुंबईत मुसळधार पाऊस : 16 Aug 2025

मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट जारी झाला असून, काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा आहे. रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाट परिसरातही जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. दहिहंडी उत्सव सुरू असताना पावसाच्या स्थितीवर लक्ष आहे. डोंबिवलीतील पंचेचाळीस वर्षे जुनी सीमंतिनी सोसायटी इमारत अचानक खचली, मात्र रहिवाशांनी तातडीने इमारत रिकामी केल्याने "नशिबाने कुठलीही दुर्घटना झाली नाही." कोकणातही पावसाने जोर धरला असून, नद्यांना पूर आले आहेत; रामपूर घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. धाराशिवमधील तेरणा डॅम ओव्हरफ्लो झाला असून, पर्यटकांनी सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याचा आरोप केला आहे. हिंगोली जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola