Mumbai Rains | मुंबईत 300mm पाऊस, शहरात तारांबळ; मुख्यमंत्र्यांकडून आढावा

राज्यात जोरदार पाऊस सुरू असून, प्रशासन आणि सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी पावसाचा आढावा घेतला आहे. मुंबईत काही ठिकाणी 300 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. हा पाऊस अतिवृष्टीपेक्षाही जास्त असल्याने मुंबईमध्ये मोठी तारांबळ उडाली आहे. राज्यभरातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते. या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाची बैठकही पार पडली आहे. मिठी नदी धोका पातळीवर गेल्यामुळे स्थानिकांना स्थलांतरित करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत. पूरग्रस्त भागातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola