Mumbai Heavy Rain : मुंबईत मुसळधार पाऊस, अहमदाबाद महामार्ग पूर्णपणे पाण्याखाली ABP MAJHA

पावसाने मुंबई आणि परिसरात पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. यामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. नायगावजवळच्या वासमारे पुलाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्याची दृश्ये समोर आली आहेत. दुचाकीस्वार याच पाण्यातून वाट काढत होते, त्यांचे टायर पूर्णपणे भिजले होते. गुडघ्याच्या वर पाणी साचल्याचे दिसून आले. यामुळे मुंबई-अहमदाबाद मार्गावर वाहतुकीची स्थिती निर्माण झाली. नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मुंबई आणि परिसरात कालही पाऊस होता आणि आजही पावसाने आपला वेग कायम ठेवला आहे. सकाळपासूनच पाऊस कोसळत आहे. मध्ये मध्ये काही ठिकाणी पावसाचा वेग कमी होत असला तरी संततधार कायम आहे. यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठिकठिकाणी विस्कळीत झाली असून, नागरिकांचा खोळंबा झाला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola