Mumbai Rains | ट्रॅकवर पाणी, Western Railway विस्कळीत; प्रवासी पायी चालले
वसई-विरार शहरात आज धुवांधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. नालासोपारा आणि वसई स्टेशनदरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. काही लोकल ट्रॅकवर थांबल्या आहेत, तर काही धीम्या गतीने पाण्यातून मार्ग काढत वसई स्टेशनकडे जात आहेत. वसई ते नालासोपारा दिशेने अनेक प्रवासी ट्रॅकवरून पायी चालत जात असल्याचे चित्र आहे. सकाळी कामावर निघालेल्या साकरमणींना याचा मोठा फटका बसला आहे. सध्या नायगाव, वसई किंवा नालासोपारा येथून अनेक प्रवासी ट्रॅकवरून चालत आपले घर गाठत आहेत. एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी वसई येथून या परिस्थितीचा आढावा घेतला.