Mumbai Rain Marin Drive : मुसळधार पाऊस,खवळलेला समुद्र, उंच लाटा; मरिन ड्राईव्हवरुन LIVE
मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावलेली. त्यात मुंबई हवामान विभागाकडून आज मुंबईला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही तासांत मुंबई परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईच्या समुद्रात आज ११ वाजून ३६ मिनिटांनी ४.३२ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. याच कालावधीत पावसाचं प्रमाण अधिक राहिल्यास सखल भागांमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता आहे. मरीनड्राईव्ह येथून तेथील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी