Amit Shah Full Speech Pune : पवारांवर हल्ला, ठाकरेंना टार्गेट;पुण्यातून अमित शाह गरजले

Amit Shah Full Speech Pune : पवारांवर हल्ला, ठाकरेंना टार्गेट;पुण्यातून अमित शाह गरजले

 "उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत. औरंगजेब फॅन क्लब  राज्याला सुरक्षित ठेवू शकतात का?" असा सवाल करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.  पुण्यात (Pune) महाराष्ट्र भाजपचे अधिवेशन पार पडले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

 देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ विकासाचा राहिलाय 

अमित शाह म्हणाले, कार्यकाळ हा विकासाचा राहिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जुलै रोजी मोदी आले आणि त्यांनी ३० हजार कोटींच्या कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले. देशाच्या जनतेने राहुल गांधी यांच्या खटाखटवर विश्वास ठेवला नाही. हिमाचल, कर्नाटक आणि तेलगणा मध्ये तुमचे सरकार आहे, मग तेथील लोकांना पैसे द्या, असं आव्हानही अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमोर ठेवलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola