Railway Protest: मुंबईत मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे 2 प्रवाशांचा मृत्यू

Continues below advertisement
मुंबईत मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे दोन प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. Mumbra रेल्वे अपघात प्रकरणी अभियंता समर यादव (Samar Yadav) आणि विशाल डोळस (Vishal Dolas) यांच्यावर दाखल झालेला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मागे घेण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. आंदोलकांची मुख्य मागणी होती की, ‘दोषी अभियंत्यांवरील गुन्हा मागे घेण्यात यावा’. ९ जून रोजी मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता, ज्यानंतर विभागीय चौकशी करून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज संध्याकाळी CSMT स्थानकात झालेल्या या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे तासभर विस्कळीत झाली. त्यामुळे अनेक प्रवाशांनी रेल्वे रुळावरून चालत घर गाठण्याचा प्रयत्न केला, पण मशीद बंदर आणि सँडहर्स्ट रोड स्थानकांदरम्यान लोकलच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आणि दोन जण गंभीर जखमी झाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola