Ratnagiri Farming | मुंबई-पुण्यातून परतलेल्या तरुणांनी फुलवला भाजीचा मळा, शिवने गावातील तरुणांचा प्रेरणादायी उपक्रम | स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement
लॉकडाऊनच्या काळात कामधंदा नसल्यानं हातात मोबाईल घेत नाक्यानाक्यावर बसलेले तरूण हे चित्र आता नित्याचच दिसून लागलंय, नेमकं करायचं काय? हाच प्रश्न सध्या सर्वांना भेडसावतोय पण, कोकणातील ऐन विशीतल्या तरूणांनी मात्र सर्वांसमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील शिवने गावचं दिसणारं चित्र फारच दिलासादायक आहे. कारण शेतात राबणारे हे तरूण 20 ते 25 याच वयाचे असून लॉकडाऊनमुळे मुंबई, पुण्यातून आपल्या गावी आलेले आहेत. या तरूणांनी मंदीत देखील संधी शोधत एकत्र येत शेती करण्याचा निर्णय करत जवळपास 21 प्रकारच्या भाजीची लागवड केलीय. फुड प्रोसेसिंगमध्ये पदवी मिळवलेल्या आशिषच्या डोक्यात ही कल्पना आली आणि त्याला गावातील तरूणांनी साथ देत मोबाईवर फिरणारे हात शेतात राबू लागले.
Continues below advertisement