Mumbai Pravin Darekar : भाजप आमदारांची आज मुंबईत खलबतं, राज्याचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार?
उद्यापासून सुरु होत असलेलं राज्याचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे हे हिवाळी अधिवेशन नागपुरात होत नाहीए. त्यात अधिवेशनाचा कालावधीही कमी असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यातच ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालामुळे विरोधक ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे. कमी कालावधीचं अधिवेशन असलं तरी सरकारची कोंडी करण्यासाठी भाजप आज रणनीती आखणार आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News