Mangal Prabhat Lodha On Pigeon | कबुतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, कबुतरखान्यासंदर्भात घेतली बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबूतरखान्यांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लोकांच्या भावना आणि शंभर वर्षांची जुनी परंपरा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. यापुढे कबूतरखान्यांमध्ये रेस्ट्रिक्टेड फिडींग सुरू होणार आहे. साफसफाईसाठी टाटाने तयार केलेल्या मशीनचा वापर केला जाईल. एकही कबूतर मरू नये याची काळजी सरकार, समाज आणि प्रशासन मिळून घेणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. महानगरपालिका या सर्व नियमांची अंमलबजावणी करणार आहे. कबूतरखान्यांचे पाणी परत जोडले जाईल आणि बंद केलेले कबूतरखाने पुन्हा सुरू होतील. पर्यायी जागांचा विचारही केला जाईल. 'लोकांच्या जीवनाचे महत्त्व सर्वात मोठे आहे, पण त्याचबरोबर कबूतरही मरू नये. याचा समतोल साधण्याचा आदेश त्यांनी महानगरपालिकेला दिला आहे.' असे सांगण्यात आले. हा निर्णय अतिशय समाधानकारक असून इतिहासात कायम राहील.