Mumbai North Public Review : पियूष गोयल का भूषण पाटील? कोण जिंकणार? बोरीवलीकरांना काय वाटतं?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPiyush Goyal vs Bhushan Patil मुंबई: राज्यात आज लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election 2024) पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी नागरिकांनी मतदानासाठी रांग लावलेली आहे. सकाळपासूनच मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद दिसून येतोय. याचपार्श्वभूमीवर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार पियुष गोयल (North Mumbai Piyush Goyal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईसह देशभरात मतदारांच्या लांब रांग पाहून खूप आनंद वाटतोय, असं पियुष गोयल यांनी सांगितले.
मुंबईत मतदार मोठ्या संख्येने मतदान करणार असं दिसून येत आहे. गेल्यावेळेच्या तुलनेत यंदा जास्त मतदान होईल. जनता देशाच्या उज्वल भविष्यासाठी आपला निर्णय देईल. ही निवडणूक माझ्यासाठी एक वेगळा आणि चांगला अनुभव होता. यावेळी मी लाखो लोकांच्या समस्या जाणून घेतला. आपल्या लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलणं, हे खूप समाधानकारक आहे, असं उत्तर मुंबई लोकसभेतील महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी सांगितले.