
Dahi Handi | गणेशोत्सवापाठोपाठ दहिहंडी उत्सवाला कोरोनाचं ग्रहण!
Continues below advertisement
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशासह राज्यातील अनेक उत्सव रद्द करण्यात आले आहेत. मुंबईतील मोठ्या मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता गोपाळकाला म्हणजेच दहिहंडी उत्सव देखील साजरा करणार नसल्याचं दहिहंडी समन्वय समितीनं जाहिर केलं आहे. दहिहंडी उत्सव यंदा होणार नाही व तो साजरा केला जाऊ नये असे आवाहन दहिहंडी समन्वय समितीने सर्व मंडाळांना केले आहे.
Continues below advertisement