Mumbaikar | मुंबईतील पाणी शुद्ध आणि पिण्यायोग्य | ABP Majha
देशभरातील पाण्याच्या गुणवत्तेबाबत नेहमी चर्चा होत असते. पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याबाबत अनेकदा शंका व्यक्त केली जाते. मात्र मुंबईतील पाणी पिण्यासाठी सर्वात शुद्ध असल्याचं विविध चाचण्यांमध्ये सिद्ध झालं आहे. पिण्याच्या पाण्याबाबत इंडियन स्टँडर्ड ब्युरोकडून करण्यात आलेल्या चाचणीनंतर मुंबईतील पाणी हे 20 शहरांच्या रँकिंगमध्ये शुद्धतेच्या तुलनेत अव्वल क्रमांकावर आहे. इतर शहरांच्या तुलनेत मुंबईचं पाणी पिण्यासाछी आधिक योग्य असल्याचं रँकिंगमध्ये समोर आलं आहे.