Monorail Mishap: 'हा अपघातच, मॉकड्रिल नाही', कर्मचारी संघटनेचा दावा; MMRDA प्रशासनाचा बनाव?
Continues below advertisement
मुंबईतील वडाळा (Wadala) येथे मोनोरेलच्या (Monorail) ट्रायल रनवेळी झालेल्या अपघातावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. मोनोरेल प्रशासनाने हा अपघात नसून मॉकड्रिल (Mockdrill) असल्याचा दावा केला आहे, तर कर्मचारी संघटनेने हा अपघातच असल्याचं म्हटलं आहे. 'ही दुर्घटना आहे आणि अपघात-अपघातच आहे,' असं कर्मचारी संघटनेने ठामपणे सांगितलं आहे. या घटनेत मोनोरेलच्या इंजिनच्या फायबरचं नुकसान झालं असून चाकही निखळल्याचं दृश्यांमध्ये दिसत आहे. ट्रेन कॅप्टनच्या डोक्याला दुखापत झाल्याचीही माहिती समोर आली आहे. स्थानिक आमदारांनी मात्र या घटनेला जास्त गंभीर मानण्यास नकार दिला आणि रस्त्यावरील अपघातांशी तुलना केली. सिग्नलिंग उपकरणात बिघाड झाल्याने कंट्रोल रूमला ट्रेनचे स्थान कळू शकले नाही व अपघात झाला, अशी प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement