Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर 05 नोव्हेंबर

Continues below advertisement
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मराठवाडा दौऱ्यावर भाजपने (BJP) टीकास्त्र सोडले आहे, तर दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) वीज दरवाढ रद्द करून सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. 'मुख्यमंत्री असताना मंत्रालयाबाहेर न पडणारे उद्धव ठाकरे अचानक बांधावर गेले कारण निवडणुका जवळ आल्यात', अशा शब्दात नवनाथ बन (Navnath Ban) यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. यासोबतच, शिरूरमध्ये नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वनविभागाला यश आले आहे. रत्नागिरीत दाऊदच्या (Dawood) मालमत्तेच्या लिलावाकडे मात्र कोणीही फिरकले नाही. सोलापूरमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने ग्रामस्थांशी संवाद न साधल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच, महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचा (MERC) २५ जून २०२५ चा पुनर्विचार आदेश न्यायालयाने रद्द केला असून, ग्राहकांना आणि इतरांना संधी दिल्याशिवाय दरात बदल करता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola