Metro Name Row: 'मेट्रो स्टेशनच्या नावावरून वाद, सायन्स सेंटर हे नाव दिलं ते महत्वाचं - बावनकुळे

Continues below advertisement
मुंबईतील मेट्रो ३ (Mumbai Metro 3) च्या वरळी येथील नेहरू सायन्स सेंटरजवळच्या स्टेशनच्या नावावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. या स्टेशनला 'सायन्स सेंटर' असे नाव दिल्याने काँग्रेसने (Congress) आक्षेप घेतला असून, सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे. 'जाणीवपूर्वक स्टेशनवरुन नेहरू हे नाव काढण्यात आले असून यामधूनच भाजपाची नेहरूंबद्दलची पोटदुखी दिसते', असा हल्लाबोल सचिन सावंत यांनी केला आहे. हा नेहरूंच्या स्मृतीचा अपमान असून त्यांची संकुचित आणि सूडाची मानसिकता यातून दिसते, असेही सावंत म्हणाले. सदर मेट्रो स्टेशनला 'नेहरू सायन्स सेंटर' (Nehru Science Centre) असेच नाव देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसने लावून धरली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola