Mumbai Metro Extended Timings | गणेशोत्सवात मुंबईकरांसाठी मेट्रोचा दिलासा, रात्री १२ पर्यंत सेवा

मुंबईकर गणेश भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गणेशोत्सवाच्या काळात मेट्रो सेवांच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मेट्रो लाईन टू ए (अंधेरी पश्चिम-दहिसर) आणि मेट्रो लाईन सेव्हन या मार्गांवर मध्यरात्रीपर्यंत मेट्रो चालवण्यात येणार आहे. सामान्यतः रात्री ११ वाजेपर्यंत धावणारी मेट्रो या काळात रात्री १२ वाजेपर्यंत धावेल. गणेशोत्सव काळात भाविकांना प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने एमएमआरडीएने हा निर्णय घेतला आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी प्रवास करणाऱ्या लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मेट्रोच्या विस्तारित वेळेमुळे रात्री उशिरापर्यंत गणेश मंडळांना भेट देणाऱ्या भाविकांना सोयीस्कर प्रवास करता येईल. हा निर्णय मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola