Mumbai Metro 3 Underground Metro : मुंबईच्या पोटातून गारेगार प्रवास;भुयारी मेट्रो खास सफर

Continues below advertisement

Mumbai Metro 3 Underground Metro : मुंबईच्या पोटातून गारेगार प्रवास;भुयारी मेट्रो खास सफर

मुंबईची पहिली वहिली अंडरग्राऊंड मेट्रो सेवा, अर्थात मेट्रो तीनचा पहिला टप्पा लवकरच सेवेत येणार आहे. बीकेसी ते आरे कॉलनी असा पहिला टप्पा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकते, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली आहे. या मार्गासाठी शेवटची परवानगी पुढील आठवड्यात मिळणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.  याशिवाय बीकेसी ते कफ परेड हा अंडरग्राऊंड मेट्रोचा टप्पा एप्रिल 2025 पर्यंत खुला करण्याचाही प्रयत्न आहे.  पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रो प्रवासासाठी मुंबईकरांना किमान 10 रुपये ते 50 रुपये मोजावे लागू शकतात.   

अनेक वर्षांपासून मुंबईकर ज्या मेट्रो लाईनची प्रतीक्षा करत होते ती मेट्रो लाईन अखेर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. ही मेट्रो लाईन म्हणजेच मुंबईच्या भूगर्भातून जाणारी अॅक्वा मेट्रो लाईन. संपूर्ण 33 किलोमीटर लांबीची ही मेट्रो मार्गिका असली तरी या मालिकेचा केवळ पहिला टप्पा मुंबईकरांना आता वापरता येणार आहे. या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहेत. 

अॅक्वा लाईन ही आरे जेव्हीएलआर ते बीकेसी ते कुलाबा अशी एकूण 33 किलोमीटरची मार्गिका आहे. पूर्णतः भूमिगत असलेली ही मेट्रो मार्गिका भारतातली एकमेव मेट्रो मार्गिका आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एम एम आर सी एल ने या मेट्रोच्या निर्माण केला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या मार्गिकेच्या पहिला टप्पा म्हणजेच आरे ते बीकेसी हा सुरू करण्यात येणार आहे. या टप्प्यात दहा स्थानकांचा समावेश आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram