Chembur School : 'आम्ही फक्त शिस्तीचं पालन करायला सांगितलं',चेंबूरमधील St. Anthony School चं स्पष्टीकरण

Continues below advertisement
मुंबईच्या चेंबूरमधील (Chembur) सेंट अँथोनी गर्ल्स हायस्कूलमध्ये (St. Anthony's Girls' High School) मेहंदी लावण्यावरून वाद निर्माण झाला आहे. 'विद्यार्थ्यांना फक्त शिस्तीचं पालन करायला सांगितलं होतं', असं स्पष्टीकरण शाळेकडून देण्यात आलं आहे. शाळेने दहा ते पंधरा विद्यार्थिनींना हातावर मेहंदी लावल्यामुळे वर्गात बसू दिले नाही, असा आरोप पालकांनी केला आहे. या घटनेनंतर पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली, ज्याची दखल घेत शिक्षण विभागाने शाळेला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. शाळेने मात्र हे आरोप फेटाळून लावत केवळ नियमांचे पालन केले जात असल्याचे म्हटले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola