Polls Without VVPAT: ‘या निवडणुकीमध्ये VVPAT चा वापर करणार नाही’, निवडणूक आयोगाची घोषणा

Continues below advertisement
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT शिवायच होणार आहेत, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही मोठी घोषणा केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ‘या निवडणुकीमध्ये VVPAT चा वापर आपण करणार नाहीये’. कायद्यात VVPAT ची तरतूद नसल्याचे आणि मल्टी-मेंबर प्रभागांसाठी तांत्रिक अडचण असल्याचे कारण त्यांनी दिले. महाविकास आघाडी, मनसे आणि इतर विरोधी पक्षांनी दुबार मतदारांचा आणि सदोष मतदार यादीचा मुद्दा उचलून धरला होता, तसेच १५ ऑक्टोबरपर्यंतची अद्ययावत यादी देण्याची मागणी केली होती. हा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला असून उत्तराची प्रतीक्षा असल्याचे आयुक्तांनी सांगितले. दुबार मतदारांची तपासणी मतदान केंद्रावरही केली जाईल आणि गरज पडल्यास लेखी हमीपत्र घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola