Mumbai Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

Continues below advertisement
मध्य रेल्वेने (Central Railway) मुंबईतील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. रविवार, २६ ऑक्टोबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य आणि ट्रान्स-हार्बर (Trans-Harbour) मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११:०५ ते दुपारी ३:४५ पर्यंत ब्लॉक असेल. या काळात जलद गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार असून, त्या १५ मिनिटे उशिराने धावतील. ट्रान्स-हार्बर मार्गावर, ठाणे आणि वाशी/नेरुळ दरम्यान सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० पर्यंत सेवा पूर्णपणे बंद राहील. पश्चिम रेल्वेवर (Western Railway) दिवसा कोणताही ब्लॉक नसला तरी, शनिवारी-रविवारी मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान रात्रीचा जंबो ब्लॉक असेल. प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी रेल्वेच्या वेळापत्रकातील बदल लक्षात घ्यावेत, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola