Mumbai Maratha Morcha : मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण द्या, मराठा क्रांती मोर्चा

Continues below advertisement

Mumbai Maratha Morcha :  मुंबईतील मराठा मोर्चामध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह, मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण द्या-आंदोलकआरक्षणाच्या मागणीसाठी आज मुंबईत मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं... मात्र या आंदोलनात मराठा समाजामध्ये आज दोन वेगवेगळे मतप्रवाह असल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून ओबीसी प्रमाणपत्र द्यावं ही मागणी जरांगे पाटलांकडून केली जातेय. तर आज मुंबईत मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण द्यावं आणि ते 50% च्या आत बसवून द्यावे ही मागणी आंदोलकांनी केलीये.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram