Andolan | राजकीय पक्षांच्या बंद आंदोलन, मोर्चाला व्यापारी वैतागले | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jan 2020 08:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी एक मोठा निर्णय घेतलाय. राज्यातील व्यापारी यापुढं कुठल्याही बंदमध्ये सहभागी होणार नाहीत. असा ठराव महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने पारित केलाय. सततचा बंद, आंदोलनं आणि मोर्चामुळं व्यापारी वैतागले आहेत. बंदमध्ये मोठं आर्थिक नुकसान होत असल्याचं सांगत व्यापारी संघटनेनं हा ठराव मांडला. राजकीय पक्षांनी बंदला पाठिंबा देण्याची विनंती केल्यास दिवसभर डाव्या दंडावर काळी पट्टी लावून निषेध नोंदवू पण बंदमध्ये सहभागी होणार नाही, असा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिलीय.