Relief Package for Rain-Hit Areas | अतिवृष्टीग्रस्तांसाठी सरकारकडून 10 हजार कोटींची मदत जाहीर
Continues below advertisement
राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून 10 हजार कोटी रुपये जाहीर करत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. सणासुदीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी राहू नये म्हणून दिवाळीपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत दिली जाईल यासाठी प्रयत्न करु, असं मुख्यमंत्री म्हणाले. जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 10 हजार प्रति हेक्टर मदत देणार आहोत, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
Continues below advertisement