Pigeon Politics दादर कबूतरखान्याचा मुद्दा पेटणार?, कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान पोस्टर्स व्हायरल
Continues below advertisement
मुंबईत कबुतरखान्याच्या (Kabutar Khana) मुद्द्यावरून राजकारण तापले असून जैन समाज (Jain Community) आणि 'आम्ही गिरगावकर' संघटना आमनेसामने आली आहे. 'कबूतर की टीट से उसकी जान चली गई तो क्या टीट से जाएगी, मुझे डॉक्टरों को भी मूर्ख कहता हूं', असे वादग्रस्त विधान जैन मुनींनी करून डॉक्टरांनाच अज्ञानी ठरवले आहे. यानंतर 'आम्ही गिरगावकर' संघटनेने 'कबूतर, Go Back to Marwar Rajasthan' असे पोस्टर लावून आक्रमक भूमिका घेतली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या (BMC Elections) पार्श्वभूमीवर हा वाद चिघळला असून, महाविकास आघाडीने मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांना लक्ष्य केले आहे. लोढा यांनी या प्रश्नातून मार्ग काढावा आणि कबुतरांसाठी 'कबूतर टॉवर' उभारावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे, महायुती सरकार कोर्टाचे आदेश आणि नागरिकांच्या भावना यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement