Gopichand Padalkar On Rohit Pawar : पडळकरांचा पवारांवर हल्लाबोल, म्हणाले 'नेता बनायची घाई'
Continues below advertisement
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) प्रकरणावरून जोरदार टीका केली आहे. '२०१९ ला हाच रोहित पवार निलेश घायवळच्या मदतीनं आमदार झालाय,' असा थेट आरोप पडळकर यांनी केला आहे. तेव्हा घायवळ गुंड नव्हता का, असा सवाल करत पडळकरांनी रोहित पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रोहित पवार यांना नेता बनण्याची घाई झाली असून त्यांना अक्कल फार कमी आहे, अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला. तुम्ही म्हणालं की गुंड आणि तुम्हीच म्हणालं की समाजसुधारक, असे होत नाही, असेही पडळकर म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement