JVLR Pot Holes : JVLR वरुन जाणार आहात? सावधान! रस्त्यांवर आहे खड्ड्यंचं साम्राज्य ABP Majha
Continues below advertisement
आपल्याकडे पावसाळा सुरू झाला की रस्त्यांची दुरवस्था नित्याची. महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांना जोडणाऱ्या जेव्हीएलआरची तर अक्षरशः चाळण झाली आहे. एल अँड टी फ्लायओव्हर संपताना तर रस्त्याची जी अवस्था आहे, त्याला खडड्डे म्हणणं अन्यायकारक ठरेल.. कारण इथलं डांबरच वाहून गेलंय.. उरलीये ती फक्त रेती आणि त्यावर पेवर ब्लॉकनं केलेली दयनीय डागडुजी. यामुळे इथं दिवसभर वाहतूक कोंडी होते.. एवढंच नाही तर यानं दुचाकीस्वारांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. पण आपली व्यवस्था इतकी निर्ढावलेली आहे, की दरवर्षी हीच अवस्था होऊनही त्यात कुठलाही बदल मात्र होत नाही.
Continues below advertisement