Security Issue | आमच्या जिवाला धोका, सुरक्षा वाढवा; जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवार यांची मागणी | ABP Majha

Continues below advertisement
महाराष्ट्र विकास आघाडीतील दोन मंत्र्यांनी आपल्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (5 फेब्रुवारी) झालेल्या बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. सरकार माजी मंत्र्यांना सुरक्षा पुरवतं, मग आजी मंत्र्यांना आवश्यक सुरक्षा हवी, असं दोन्ही नेत्याचं म्हणणं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram