Rohit Arya Encounter : मुंबईत १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू
Continues below advertisement
मुंबईच्या पवई (Powai) भागातील एका स्टुडिओमध्ये घडलेल्या थरारनाट्यात, पोलिसांनी १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या (Rohit Arya) याचा खात्मा केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'आरोपी रोहित आर्याचा मुलांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न होता', याच कारणामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला. सुमारे दीड तास चाललेल्या या थरारनाट्यात, आर्याने मुलांना एका स्टुडिओमध्ये डांबून ठेवले होते. अखेर पोलिसांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत सर्व मुलांची सुखरूप सुटका केली. या कारवाईदरम्यान, आरोपी रोहित आर्याच्या डाव्या छातीत गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला, असे वृत्तात म्हटले आहे. सुटका करण्यात आलेल्या सर्व मुलांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement