Mumbai Hostage Crisis: रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने 17 मुलांना डांबून ठेवलं, कारण काय?

Continues below advertisement
मुंबईतील पवई (Powai) परिसरात वेबसीरीजच्या ऑडिशनच्या (Web Series Audition) नावाखाली सतरा मुलांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली. रोहित आर्य (Rohit Arya) नावाच्या व्यक्तीने मुलांना डांबून ठेवले होते. 'तुमच्याकडून जराही चूक झाली, तर मी संपूर्ण जागेला आग लावेन आणि स्वतःला संपवेन', असा थेट इशारा आरोपी रोहित आर्यने व्हिडिओद्वारे पोलिसांना दिला. पोलिसांनी अत्यंत नाट्यमयरित्या स्टुडिओच्या बाथरूममधून प्रवेश करून आरोपीला ताब्यात घेतले आणि सर्व मुलांची सुखरूप सुटका केली. घटनास्थळावरून एक एअर गन आणि काही रसायने जप्त करण्यात आली आहेत. रोहित आर्य याने हे कृत्य का केले, यामागे त्याचा नेमका हेतू काय होता, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. मुलांची सुखरूप सुटका झाल्याने पालक आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola