Bachchu Kadu : 'कर्जमुक्तीची घोषणा तारखेसह करा, नाहीतर...', बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा
Continues below advertisement
शेतकरी नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी कर्जमुक्तीच्या (Loan Waiver) मागणीसाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारसोबत चर्चेसाठी शिष्टमंडळ मुंबईला रवाना होण्यापूर्वी त्यांनी सरकारला थेट आव्हान दिले. 'आता तो डाग जर तुम्हाला खरंतर पुसून टाकायचा असेल, तर तुम्ही कर्जमुक्तीची घोषणा वेळ तारखासह कशी होते ते सांगावी', असे बच्चू कडू म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पूर्वीच्या वक्तव्याची आठवण करून दिली, ज्यात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला होता, मात्र आता राज्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. या आंदोलनात राजू शेट्टी (Raju Shetti), महादेव जानकर (Mahadev Jankar) यांसारखे नेतेही सहभागी आहेत. न्यायालयाच्या हस्तक्षेपावरही कडू यांनी नाराजी व्यक्त केली, न्यायालयीन प्रणालीवरील विश्वास कमी झाल्यास शेतकऱ्यांनी कोणाकडे जायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement