Mumbai Hostage Crisis: 17 मुलांची अखेर सुटका, मुलांना सुखरूप घेऊन बस निघाली VIDEO
Continues below advertisement
मुंबईतील पवई (Powai) येथे एका स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी आलेल्या सुमारे १७ मुलांना ओलीस ठेवल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी रोहित आर्य (Rohit Arya) नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 'मी एकटा नाही, माझ्यासोबत आणखी देखील लोक आहेत,' असे म्हणत आर्य याने मुलांना डांबून ठेवल्याची माहिती आहे. पुण्यातील रहिवासी असलेल्या रोहित आर्यचा आरोप आहे की, दीपक केसरकर (Deepak Kesarkar) मंत्री असताना त्याला शिक्षण विभागाशी संबंधित एक टेंडर मिळाले होते, ज्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. याच पैशांच्या मागणीसाठी त्याने अनेकदा आंदोलनही केले होते. पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने कारवाई करत, स्टुडिओच्या बाथरूममधून प्रवेश करून सर्व मुलांची सुखरूप सुटका केली आणि आरोपी रोहित आर्यला ताब्यात घेतले. या मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे जबाब नोंदवण्याचे काम पवई पोलीस करत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement