Mumbai Hostage Crisis: 'टक्केवारीऐवजी थेट पार्टनरशीप', Rohit Arya प्रकरणानंतर भ्रष्टाचाराच्या नव्या मॉडेलवर प्रश्नचिन्ह!

Continues below advertisement
मुंबईतील पवई (Powai) येथे Rohit Arya याने १७ मुलांना ओलिस ठेवल्याच्या घटनेनंतर प्रशासकीय व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. 'मंत्री आणि अधिकारीसुद्धा थेट टक्केवारी मागण्याच्या ऐवजी त्या निविदेमध्ये किंवा त्या व्यवहारामध्ये स्वतःची पार्टनरशीपच होतात', असा गंभीर आरोप या प्रकरणामुळे चर्चेत आला असून या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शासनाच्या छळवणुकीमुळेच रोहित आर्य मनोरुग्ण झाला का, याचाही विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. रोहित आर्य याने 'माझी शाळा, सुंदर शाळा' या प्रकल्पाचे श्रेय आणि मोबदला न मिळाल्याने शिक्षण विभागावर आरोप केले होते. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola