Mumbai Highcourt:100 -500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा मुंबईत तुटवडा,दोन आठवडयांनी पुढील सुनावणी

Continues below advertisement

प्रतिज्ञापत्रांसह वेगवेगळ्या कायदेशीर कामांसाठी अतिशय आवश्यक असलेले 100 आणि 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा, मुंबईत तुटवडा निर्माण झालाय.. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल कऱण्यात आलेल्या याचिकेवर काल सुनावणी झाली. राज्य सरकारला स्पष्टीकरण देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. काही मोजक्याच मुद्रांक विक्रेत्यांच्या मक्तेदारीमुळं स्टॅम्प पेपरचा तुटवडा झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.. दरम्यान मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने राज्य सरकारसह सर्व प्रतिवाद्यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिलेत. आता या याचिकेवर  दोन आठवडयांनी पुढील सुनावणी होणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram