कोकणात सतत पडणाऱ्या पावसामुळे Mumbai-Goa महामार्गाची चाळण, पावसामुळे रस्त्यावर खड्ड्यांचं सम्राज्य
Continues below advertisement
रत्नागिरी जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्याचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाची चाळण झालीय. मागील कित्येक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरु आहे. त्यात पुलाचं काम रखडल्यामुळे आणि सतत बरसणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेत. त्यामुळे वाहतूक करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे.. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांची डागडुजी वेळेत होणं गरजेचं आहे, अशी आशा कोकणात जाणाऱ्या वाहनचालकांनी व्यक्त केलीए.
Continues below advertisement
Tags :
Raigad Ratnagiri Chiplun Monsoon 2021 Ratnagiri Rains Mumbai Goa National Highway Potholes Issues