Arun Gawli Bail : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला जामीन, 18 वर्षांनी सुटका
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर अठरा वर्षांनंतर त्याची सुटका झाली. मुंबई शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी नागपूर कारागृहात शिक्षा भोगत होता. अवघ्या काही मिनिटांपूर्वी त्याची सुटका झाली असून, तो तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. नागपूर विमानतळावरून तो आपल्या सहकाऱ्यांसोबत मुंबईला गेला. दुसरीकडे, मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना याचिकाकर्ते विनोद पाटील हे ताज हॉटेलमध्ये जाऊन झोपले होते, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी केला आहे. "ताज मध्ये झोपले होते," असे पाटील यांनी म्हटले आहे. आरक्षणाच्या बाबतीत विनोद पाटील झोपले होते, असेही त्यांनी नमूद केले.