Mumbai Goa Highway Potholes : खड्ड्यामुळे 'राँग वे'ने जीवघेणा प्रवास; मुंबई-गोवा हायवेचं भीषण वास्तव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्या आधी पळास्पे पासून आम्ही प्रवास सुरू केला, तिथून पेण रेल्वे पुलापर्यंत रस्ता सिमेंटचा असल्याने प्रवास नॉन स्टॉप झाला पण पेण इथे थांबावे लागले,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई नाशिक महामार्गाची पाहणी केल्यानंतर रस्त्याच्या दुर्दशा बघून काही कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली होती, आज पुन्हा मुख्यमंत्री मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत, त्यामुळे आधीच या महामार्गावर खड्डे भरण्याची आणि कचरा काढण्याची कामे सुरू आहेत, ही कामे रात्री आणि सकाळपासून सुरू केल्याचं दावा वाहन चालकांनी एबीपी माझाशी बोलताना केलाय, तर आम्ही काम करणाऱ्या ठेकेदारशी देखील बोललो, त्याने सांगितले आहे मुख्यमंत्री येण्याच्या आधी डांबर टाकून खड्डे भरायचे आहेत, पण रात्रीपासून सुरू असलेला पाऊस आणि आताही सुरूच आहे, अश्या पावसात खड्डे भरण्याचे काम हे कंत्राटदार करत आहेत, या रस्त्याचा आढावा आणि ठेकेदराशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी....