कोकणाच्या वाटेवर खड्ड्यांचं विघ्न, Mumbai-Goa Express Way ची खड्ड्यामुळे चाळण : ABP Majha
मागील काही वर्षांपासून सुरु असलेलं मुंबई गोवा महामार्गाच काम अजूनही पूर्ण झालेलं नाहीय. त्यातच या महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला होता. गणेशोत्सवासाठी कोकणाच्या वाटेवर चाकरमान्याना खड्ड्यांचं विघ्न आहे. Mumbai-Goa Express Way ची खड्ड्यामुळे चाळण झाली आहे. तरी या प्रवास कधी सुखकर होणार यावर प्रश्नचिन्ह अद्याप कायम आहे.