Mumbai Breaking: वांद्रे Linking Road वर National College जवळ गॅस पाइपलाइन फुटली, वाहतूक विस्कळीत

Continues below advertisement
मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील लिंकिंग रोडवर नॅशनल कॉलेजजवळ गॅस पाइपलाइन फुटल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या गॅस गळतीमुळे, 'या परिसरातली वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे'. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणांनी परिसरातील वाहतुकीत बदल केले असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. अद्याप या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही, मात्र परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola