Dhangar Reservation |आरक्षणाच्या मागणीसाठी 26 फेब्रुवारीला धनगर समाजाचं ‘सुंबराण’ आंदोलन | ABP Majha

राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर धनगर समाज आरक्षणासाठी राज्य सरकारवर पुन्हा एकदा दबाव आणण्याच्या तयारीत आहे. आरक्षण मिळवण्यासाठी धरगर समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे.

तिकडे महाविकासआघाडी सरकारचे अधिवेशन मुंबईमध्ये होत असतानाच आता धनगर समाजाने सुद्धा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर आंदोलनाची घोषणा केलीय.

आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत येत्या 26 तारखेला धनगर समाज सुंबराण आंदोलन करणार आहे. या अधिवेशनात धनगर आरक्षण सोडवला नाही तर, थेट मुख्यमंत्र्यांच्या घरासह इतर मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. बीडमध्ये काल राज्यस्तरीय धनगर समाजाच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर यशवंत सेनेचे संस्थापक भारत सोन्नर माध्यमांशी बोलत होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola