Teachers for Census Work | शिक्षकांच्या मे महिन्यातील सुट्टीबाबत लवकरच निर्णय घेऊ : बच्चू कडू
Continues below advertisement
मे महिन्यातील शिक्षकांची सुट्टी रद्द करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू क़डू यांनी दिली आहे. 4 फेब्रुवारीला मुंबईत एक बैठक होणार आहे, त्यात शिक्षकांवर येणाऱ्या ताणाबाबत माहिती घेऊ आणि योग्य तो निर्णय घेऊ असंही कडू म्हणाले आहेत. तर, देशाच्या जनगणनेसाठी मे महिन्यातील शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द होणार असल्याने राज्यभरातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत.
Continues below advertisement