Mumbai Dasara Melava : शिवसेना भवनाजवळ उद्धव ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री म्हणुन बॅनर्स

Continues below advertisement

Mumbai Dasara Melava : शिवसेना भवनाजवळ उद्धव ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री म्हणुन बॅनर्स 

ठाकरेंचा दसरा मेळावा हा दरवर्षीप्रमाणे एक प्रकारे पारंपारिक सोहळा असेल  शिवतीर्थवर येणाऱ्या साधारण ६० हजार कार्यकर्त्यांसाठी खुर्च्या टाकण्यात येतील   शिवाजी पार्क मैदानाबाहेर सुद्धा एलईडी लावण्यात येतील जेणेकरून शिवाजी पार्कवर सुरू असलेली भाषण ऐकता येतील  शिवतीर्थ शिवसेनेच्या भगव्या झेंड्यांनी भगवमय करण्याची तयारी केली आहे  सुरुवातीला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची भाषणे होतील   प्रथेप्रमाणे शिवतीर्थावर शस्त्रपूजन सोने वाटप आणि रावण दहन होऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  भाषणांना सुरुवात होईल  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दसरा मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाकडून रणशिंग फुंकले जाईल    आगामी विधानसभा निवडणूक, सध्याची राजकीय परिस्थिती, राज्यातील महिला सुरक्षा, हिंदुत्व, राज्य सरकारच्या योजना आणि निर्णय, राज्यातील प्रकल्प या सगळ्या संदर्भात मुद्दे  उद्धव ठाकरे आजच्या भाषणात घेण्याची शक्यता आहे ..      मोदी-शाह यांचे महाराष्ट्र दौरे, भाजप नेतृत्व  आणि  महायुतीकडून केली जाणारी वक्तव्य याचा समाचार उद्धव ठाकरे आजच्या भाषणात घेण्याची शक्यता आहे   शिवसेना ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर येणाऱ्या हजारो शिवसैनिकांसाठी विशेष नियोजनाची जबाबदारी ठाकरे गटाचे राज्यातील संपर्कप्रमुख जिल्हाप्रमुख आणि मुंबईतील विभाग प्रमुख यांना देण्यात आली आहे  * पोलिसांचा तगडा बंदोबस्त दसरा मेळाव्याला होणारी गर्दी लक्षात घेत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तीन उपायुक्त, पाच सहाय्यक आयुक्त, ६० अधिकारी व जवळपास ३०० कर्मचारी तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवानही सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत  दसरा मेळाव्याकरिता येणाऱ्या शिवसेनाप्रेमी जनतेने व शिवसैनिकांनी जेवणाचे डबे, बंगा अथवा अन्य वस्तू घेऊन येऊ नये, असे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेच्या कारणास्तव दिले आहेत. या निर्देशांचे पालन तंतोतंत करावे. तसेच शिवाजी पार्क मैदानात प्रवेशद्वारातून प्रवेश करताना पोलीस सुरक्षा तपासणी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram