Mumbai Dadar : दादरच्या मार्केटमध्ये मोठी गर्दी,सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : ABP Majha

Continues below advertisement

मुंबईमध्ये मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. याचं एक प्रमुख कारण म्हणजे बाजारपेठांमध्ये वाढणारी गर्दी. मुंबईच्या दादर मार्केटमध्ये मोठी गर्दी बघायला मिळत आहे. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क देखील नसल्याचं चित्र आहे. सोबतच सोशल डिस्टन्सिंगचा देखील फज्जा उडताना बघायला मिळत आहे. मुंबईत मागील काही दिवसात उत्सव आणि सण देखील साजरे झाले आहेत. अशातच बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी बघायला मिळाली होती. त्यामुळे देखील रुग्णसंख्या वाढल्याचं तज्ञांकडून बोललं जातंय. दादरच्या बाजारपेठेतून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी…

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram